नागपूर वन-डेत श्रीलंकेचा विजय

December 19, 2009 9:57 AM0 commentsViews: 2

19 डिसेंबर भारत आणि श्रीलंकादरम्यानच्या दुसर्‍या वन-डेत श्रीलंकेने 3 विकेट्स राखून विजय मिळवला. भारताने विजयासाठी ठेवलेल्या 302 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना श्रीलंकेने 7 विकेट्स गमावत 302 रन्स केले. ओपनिंगला आलेल्या तिलकरत्ने दिलशानने शानदार सेंच्युरीसह 123 रन्स केले. पहिली बॅटिंग करणार्‍या भारताने धोणीच्या सेंच्युरीच्या जोरावर 301 रन्सचा टप्पा गाठला. धोणीने 107 रन्सची कॅप्टन इनिंग केली. सुरेश रैनाने 68 रन्स करत त्याला चांगली साथ दिली. या विजयाबरोबरच श्रीलंकेने पाच वन-डे मॅचच्या सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

close