नागपूर जिल्हाधिकार्‍यांची खुर्ची जप्ती करण्याचे आदेश

December 19, 2009 1:24 PM0 commentsViews: 2

19 डिसेंबर शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली नाही म्हणून नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर जिल्ह्यातील चिखली प्रकल्पासाठी सरकारने शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या. कृष्णा डफरे या शेतकर्‍याची जमीनही शासनाने दहा वर्षांपूर्वी घेतली. मात्र अद्यापही सरकारने मोबदला दिला नाही. त्यामुळे या शेतकर्‍यानी जिल्हा न्यायालयात दाद मागितली. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने कृष्णा डफरे यांना 75 लाखाचा मोबदला दिला नाही म्हणून ही जिल्हाधिकार्‍यांच्या खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

close