बिल्डरच्या गुंडांची रहिवाशांना मारहाण

December 19, 2009 1:26 PM0 commentsViews: 1

19 डिसेंबर एसआरए योजनेत फसवणूक झाल्याने बिल्डरला जाब विचारला म्हणून दहा ते बारा रहिवाशांना बिल्डरने मारहाण केली आहे. मुंबईतील वडाळा मच्छीमार्केट परिसरात एसआरए प्रकल्पाचं बांधकाम सुरू आहे. बिल्डर परवेझ लकडावाला याच्याकडे या प्रकल्पाचं काम आहे. प्रकल्पासंदर्भात आपल्याला फसवण्यात आल्याचा रहिवाशांचा आरोप होत आहे. फसवणुकीबद्दल रहिवाशांनी बिल्डरला जाब विचारला, त्यामुळे बिल्डरच्या गुंडांकडून 10-12 रहिवाशांना मारहाण करण्यात आली. जखमींना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींमध्ये महिलांचाही समावेश आहे.

close