‘फुलराणी’कडून स्वातंत्र्यदिनी भेट, WBCच्या फायनलमध्ये धडक

August 15, 2015 7:22 PM0 commentsViews:

saina nehwal215 ऑगस्ट : बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं भारतीयांना स्वातंत्र्यदिनाची भेट दिलीय. सायना नेहवाल जागतिक बॅडमिंटनच्या फायनलमध्ये पोहोचलीय. इंडोनेशियाच्या लेंडावेनी फानेत्रीचा तिने सेमीफयनलमध्ये पराभव करत इतिहास रचलाय. फायनलमध्ये प्रवेश करणारी सायना पहिली महिला खेळाडू ठरलीये. या विजयासह सायनाने सिल्व्हर मेडल पक्क केलंय. सायना आतापर्यंत सहा वेळा क्वार्टर फायनलमध्ये पोहचली होती. पण आज पहिल्यांदाच तिने सेमीफायनल आणि आता फायनलमध्ये धडक मारलीये.

आजच्या सेमीफायनलमध्ये सायनाने इंडोनेशियाच्या लेंडावेनी फानेत्रीचा 21-17, 21-17 ने पराभव केला. ही मॅच 55 मिनिटे चालली.सायना आणि फानेत्रीदरम्यान ही चौथी मॅच होती. सायनाने चार पैकी तीन सामन्यात विजय मिळलाय. रविवारी होणार्‍या फायनलमध्ये सायनाचा मुकाबला स्पेनच्या केरोलिन मारिनशी असणार आहे. मारिन आणि सायनामध्ये आतापर्यंत चारवेळा लढत झाली. ज्यामध्ये 3 वेळा सायनाने विजय मिळवला. त्यामुळे उद्याच्या फायनलमध्ये सायना गोल्डन भेट देते का हे पाहण्याचं ठरणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close