विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच वर्चस्व

December 21, 2009 10:06 AM0 commentsViews: 5

21 डिसेंबर विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी आठ जागांचे निकाल जाहीर झालेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषद निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व राखलं आहे. 4 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली आहे तर दोन ठिकाणी शिवसेनेने बाजी मारली आहे. नागपुरात मात्र काँग्रेसने भाजपचा पराभव करत नितीन गडकरी यांना धक्का दिला आहे. अहमदनगरची जागा राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराने पटकावली आहे.मुंबईमध्ये शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले आहेत. भाजपचे मधू चव्हाण यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. विजयाची हॅट्ट्रिक साधत कोल्हापुरातून काँग्रेसचे महादेवराव महाडिक निवडून आले. त्यांनी जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रा.जयंत पाटील यांचा पराभव केला तर सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे दीपक साळुंके यांचा विजय झाला आहे. या ठिकाणी काँग्रेसचे बंडखोर कल्याण काळे उभे होते तर नागपूरमध्ये काँग्रेसचे राजेंद्र मुळक विजयी झाले आहेत. भाजपच्या अशोक मानकर यांचा त्यांनी पराभव केला.

close