तीन वर्षांचा मुलगा ड्रेनेजमध्ये पडला

December 21, 2009 10:10 AM0 commentsViews: 2

21 डिसेंबरमुंबईतल्या मानखुर्द भागातल्या म्हाडा कॉलनीजवळच्या एका ड्रेनेजलाइनमध्ये तीन वर्षांचा मुलगा पडला आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. मुलाला शोधण्यासाठी महानगरपालिकेचे आधिकारी, फायर ब्रिगेडचे जवान आणि पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. ही घटना होऊन 17 तास उलटले तरी मुलाचा अजून शोध लागला नाही. अयुब असं या मुलाचं नाव आहे. त्याच्या घराजवळ असणार्‍या ड्रेनेजलाइनचं झाकण उघडं होतं, त्यामुळे हा अपघात घडला असल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे.

close