IBN लोकमतचा दणका : बहिष्कृत दलित गावकर्‍यांची प्रशासनाकडून दखल

August 15, 2015 10:40 PM0 commentsViews:

amravati_news3315 ऑगस्ट : संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महारांजाच्या जन्मभूमीत म्हणजे अमरावती जिल्ह्यात दलितांवर टाकलेल्या सामाजिक बहिष्काराचा प्रश्न IBN लोकमतने उजेडा आणल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आलीये. प्रशासनाने याची दखल घेत गावकर्‍यांची भेट घेतली.

शहरापासून केवळ 30 किलोमीटर अंतरावरच्या चिंचोली ब्राम्हणवाडा गावात भेट द्यायला जिल्हाधिकारी, एसपींना वेळ नाही असं वृत्त आम्ही दाखवलं होतं. त्यानंतर आज (शनिवारी) स्वातंत्रदिनी जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलrस अधिक्षक गौतम लाख्वी यांनी या गावाला भेट दिली. या अधिकार्‍यांनी दोन्ही बाजूंच्या प्रतिनीधींची बैठक घेतली. या बैठकीत दोन सप्टेंबरला या वादग्रस्त जागेची मोजणी करण्याचा निर्णय झालाय. या मोजणीनंतर अतिक्रमण आढळून आल्यास, तातडीनं अतिक्रमण काढून टाकण्यावर दोन्ही बाजूंनी होकार दर्शवलाय. या बैठकीत रिपाई नेते राजेंद्र गवई सहभागी झाले होते.

सामाजिक बहिष्काराचं कारण काय ?
– सार्वजनिक जागेवर माजी सरपंचानं घातलं कुंपण
– कुंपणामुळे दलित वस्तीचा रस्ता बंद
– कुंपण बेकायदेशीर असल्याचा ग्रामपंचायतीचा निर्वाळा
– मात्र तरीही कुंपण काढण्यास नकार
– दलितांवर उर्वरित गावकर्‍यांनी टाकला बहिष्कार
– दलितांसाठी किराणा, दूध, गहू, चक्की सर्व बंद
– शेतीच्या कामावर दलितांना घेत नाहीत

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close