पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या युएईच्या दौर्‍यावर

August 16, 2015 4:55 PM0 commentsViews:

Modi UAE

16 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या यूएई दौर्‍यावर आहेत. 34 वर्षात यूएईचा दौरा करणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत. अबुधाबी विमानतळावर अबुधाबीच्या युवराजांनी मोदींचं शाही स्वागत केलं.

 मोदींच्या या दोन दिवसांच्या दौर्‍यात द्विपक्षीय संबंध सुधारण्यासंबंधी चर्चा होणार आहे .दहशतवाद,तसेच व्यापारी संबंधात सहकार्य करण्याविषयी पावलं उचलली जातील. दहशतवादी संघटना आयसीसविषयी ही चर्चा होण्याची शक्यता आहे. तर उद्या दुबईत प्रमुख व्यापार्‍यांना तसंच नोकरीच्या निमित्ताने राहणार्‍या भारतीयांना ते भेटणार आहेत. यावेळी ते 40 हजार भारतीयांना उद्देशून भाषण करणार आहेत. पंतप्रधान मोदी आज दुबईतल्या शेख झायेद मशिदीला भेट देणार आहेत.

भारताला मोठ्या प्रमाणात विदेशी चलन मिळवून देणार्‍यांमध्ये यूएई हा प्रमुख देश आहे. या दौर्‍यादरम्यान परदेशी उद्योजकांना भारतात उद्योग करण्याविषयीही मोदी आमंत्रण देतील असं म्हटलं जात आहे. त्यामुळे मोदींचा हा दौरा भारतासाठी महत्वाचा ठरणार आहे.

पंतप्रधानांचा यूएई दौरा :

 • आजचं वेळापत्रक
  – दुपारी 4 वा. – अबुधाबीला पोहोचतील
  – विमानतळावरून हॉटेलमध्ये जातील, तिथे दोन तास थांबतील
  – रात्री 8 वा.- शेख झायेद मशिदीला भेट
  – रात्री 9:30वा. – भारतीय वंशाच्या कामगारांशी संवाद साधणार
 • उद्याचं वेळापत्रक
  – सकाळी 9:30 वा. – माझदार या हाय टेक सिटीला भेट
  – दुपारी 12:30 वा.- अबुधाबीच्या युवराजांशी अधिकृत चर्चा
  – दुपारी 4 वा. – दुबईकडे प्रस्थान
  – दुपारी 4:30 वा. – दुबईमध्ये पोहोचतील. त्यानंतर दुबईच्या पंतप्रधानांशी चर्चा
  – संध्या. 5:30 वा. – भारताच्या राजदूतांकडून स्वागत
  – रात्री 9 वाजता – भारतीय समुदायाबरोबर मोठा कार्यक्रम. भारतीय लोकांशी संवाद साधणार.
  – रात्री 10:30वा. – परतीचा प्रवास सुरू करणार

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close