‘ताजमहाल’चं ट्विटर अकाऊंट!

August 16, 2015 1:41 PM0 commentsViews:

adaaaaaaaasrj'iy

16 ऑगस्ट : जगातील सात आश्चर्यांपैकी एक आणि भारताची जागतिक ओळख असलेल्या ‘ताजमहाल’ला आता तुम्ही जगातून कुठूनही ‘फॉलो’ करता येणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने ‘ताजमहाल’चं काल (शनिवारी) ट्विटर अकाऊंट (@Taj Mahal) सुरू केले आणि अवघ्या काही तासांत 4800 फॉलोअर्स झाले.

उत्तर प्रदेशच्या महसुलातील पर्यटकांचा टक्का हा सर्वथा ‘ताजमहाल’वरच अवलंबून असतो. हेच लक्षात घेऊन राज्य सरकारने हे ट्विटर अकाऊंट सुरू केलं. स्वत: मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या पत्नीबरोबरचा एक फोटो या अकाऊंटवर शेअर केला आहे.

‘ताजमहाल’ला भेट दिल्याचे आपले फोटोही ट्विटरवर पाठवण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. ज्या नागरिकांना असं फोटो धाडायचं असतील, तर त्यांनी #MyTajMemory इथे टॅग करावं. त्यानंतर त्यातील निवडक फोटो ताजच्या अधिकृत अकाऊंटवर अपलोड केलं जाणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close