कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा – रामदास कदम

December 21, 2009 10:14 AM0 commentsViews: 7

21 डिसेंबर 'कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा' अशा शब्दात रामदास कदम यांनी थेट भाजपवरच शरसंधान साधलं आहे. मुंबईतून विधान परिषेदवर विजयी झाल्यानंतर त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. विधानसभा निवडणुकीत गुहागरमध्ये भाजपमुळेच पराभूत झालो आणि आताही या निवडणुकीत माझा पराभव करण्याचा प्रयत्न भाजपने केला, असा आरोप रामदास कदम यांनी केला. या सगळ्या कृत्याची माहिती आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

close