पोलिसांना गुंगारा देणारा आमदार रमेश कदम अटकेत

August 17, 2015 10:01 AM0 commentsViews:

ramesh_kadam

17 ऑगस्ट : राज्यातील अण्णा भाऊ साठे महामंडळात 141 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी जवळपास एक महिन्यापासून फरार असलेले राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार रमेश कदम यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या ग्रँड हयात हॉटेलमधून त्यांना सीआयडीने अटक केली आहे. सीआयडीने रमेश कदम यांना अटक केले असून हे पथक नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर करणार आहेत. त्यांच्याविरुद्ध मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सोलापूरच्या अण्णा भाऊ साठे महामंडळातील जवळपास 141 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी त्याच्यावर दहिसरमध्ये 18 जुलै रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून गेले 30 दिवस कदम फरार होते. तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यात यावं, यासाठी अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना करण्यात आली. मात्र यामध्ये रमेश कदमांनी कोट्यवधीचा घोटाळा केला असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, रमेश कदम याच्या अटकेसाठी पोलीस आणि CID कडून अनेक पथक स्थापन करण्यात आली होती. मात्र तरीही रमेश कदम याला अटक करायला एवढा वेळ का लागला, असा प्रश्न समोर येत आहे.

सीआयडीच्या अहवालातील मुद्दे

  • राष्ट्रवादीचे आ. रमेश कदमांवर 141 कोटींचा अपहार केल्याचा ठपका
  • जोशाबा मध्यवर्ती ग्राहक संस्था : 41 कोटी 37 लाख
  • मैत्री शुगरला 30 कोटी
  • संतोष सिव्हिल सर्व्हिस कंपनीला 10 कोटी
  • महालक्ष्मी दूध उत्पादक संस्थेला 5 कोटी
  • कांदिवलीच्या रहेजा सोसायटीत 2.25 कोटींचा फ्लॅट
  • औरंगाबादेत 11 कोटींना 62 गुंठे जागा
  • स्वत:च्या खात्यावर 5 कोटी ट्रान्सफर
  • महामंडळाच्या 9 कोटी 34 लाखांमधून 16 गाड्यांची खरेदी
  • 71 लाखांच्या 2 मर्सिडिज, 62 लाखांची 1 ऑडी
  • 16 गाड्यांच्या खरेदीसाठी 23 लोकांच्या नावानं कर्ज

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close