26/11च्या हल्ल्यातील दोषी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करावी – विलासराव देशमुख

December 21, 2009 10:17 AM0 commentsViews: 6

21 डिसेंबर 26/11च्या हल्ल्याबद्दल मुंबई पोलीस दलातील दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी माजी मुख्यामंत्री विलासराव देशमुख यांनी केली आहे. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर मुख्यमंत्रीपद गमवावं लागलेल्या विलासरावांनी आता एक वर्षानंतर पोलीस दलाबाबत कडक भूमिका घेतली आहे. या हल्ल्यानतर विलासराव देशमुख, आर. आर. पाटील यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राम प्रधान समितीचा अहवाल सोमवारी विधानसभेत सादर होणार आहे. त्यापूर्वी राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

close