नाशिक, पुण्यापाठोपाठ मुंबईतही अज्ञातांनी जाळल्या 6 बाईक्स

August 17, 2015 12:32 PM0 commentsViews:

wadal adlashe

17 ऑगस्ट : नाशिक-पुण्यातील जळीतकांडाचे लोण आता मुंबईत पोहचले असून, काल मध्यरात्री वडाळय़ात अज्ञातांनी पार्क केलेल्या 6-7 बाईक्स  जाळल्याची धक्कादायक घटना वडाळ्यात घडली आहे.

वडाळा टीटी परिसरातील वडाळा पोलीस स्टेशनसमोर असलेल्या जागेत पार्क केलेल्या बाईक काल रात्री दोन अडीचच्या सुमारास हे जळीतकांड घडले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी पोलिसांना कोणताही पुरावा किंवा सीसीटीव्ही फुटेज मिळू शकले नाहीत. त्यामुळे आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close