सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंगला गँगस्टर रवी पुजारीची धमकी

August 17, 2015 2:18 PM0 commentsViews:

www.meraevents.com_33

17 ऑगस्ट : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहला रवी पुजारी गँगकडून धमकी देण्यात आली आहे. अरिजीतच्या मॅनेजरला हा धमकीचा फोन आला असून या प्रकरणी अरिजीतने ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

रवि पुजारीने 5 कोटी रुपयांची मागणी केली आहे. हे शक्य नसेल तर रवि पुजारीच्या माणसांसाठी दोन शो मोफत करण्यास सांगितलं आहे. रवि पुजारी थेट माझ्याशी बोलला नाही, पण माझ्या मॅनेजरला कॉल करुन धमकी दिल्याचं अरिजीतने म्हटलं आहे. दरम्यान अरिजीतने तक्रार नोंदवली असली तरी पोलिसांनी अद्याप गुन्ह्याची नोंद केलेली नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close