करकरे, साळसकर, कामटे यांची हत्या केली नाही – कसाब

December 21, 2009 10:22 AM0 commentsViews: 67

21 डिसेंबर हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामटे यांची हत्या आपण केलीच नसल्याचा दावा कसाबने केला आहे. कसाबचा जबाब कोर्टात घेतला गेला. या जबाबात आपल्यावरचे सर्व आरोप उडवून लावण्याची भूमिका त्याने घेतली. हल्ल्याच्या वेळी आपण तिथे हजरच नव्हतो. पोलिसांची गाडी आपण चोरली नाही. कोठडीत असताना पोलिसांनीच त्या गाडीतून आपल्याला फिरवून आणल्याचा दावा कसाबने केला आहे. आपल्या हाताला लागलेली गोळी पोलिसांनी कोठडीत असताना फायरिंग केल्यामुळे लागल्याचं तो म्हणाला. हाताला भूल देऊन पोलिसांनी फायरिंग केल्याचा उलटा आरोप त्याने केला आहे. न्यायाधीशांच्या सर्व प्रश्नांना कसाब अगदी सराईतपणे उत्तरं दिली.

close