पुरंदरेंना दिलेला ‘महाराष्ट्र भूषण’ रद्द करा -विखे पाटील

August 17, 2015 4:50 PM0 commentsViews:

vikhe on purandare17 ऑगस्ट : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना 19 ऑगस्टला राजभवनामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. सरकारनं या कार्यक्रमाची तयारी केलीय. पण या पुरस्कारावरून अजूनही वाद सुरूच आहेत. लोकभावनेचा आदर करत राज्य सरकारने बाबासाहेब पुरंदरेंना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळाच रद्द करावा आणि बाबासाहेब पुरंदरे यांनीही लोक भावनेचा आदर करावा असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. ज्या पुरस्कारामुळे दोन मत प्रवाह निर्माण होतात तो रद्द करणेच योग्य, असं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंनी मागणी केली.

तर दुसरीकडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देण्याबद्दलच्या भूमिकेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मतभेद आहेत. पवार काकापुतण्यांनी याबद्दल वेगवेगळ्या भूमिका घेतल्यायत. बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण देण्याला आमचा विरोध नाही, असं याआधी अजित पवार म्हणाले होते. आता शरद पवारांनी मात्र बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण देण्याला आक्षेप घेतलाय. याचा निर्णय जनतेवरच सोडा असं पवार म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close