सचिन तेंडुलकर होणार वनदूत !

August 17, 2015 6:33 PM0 commentsViews:

Sachin-Tendulkar17 ऑगस्ट : बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चननंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वनदूत होण्याची इच्छा व्यक्त केलीय. राज्य सरकारने अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर या दोघांनाही वन संवर्धनासाठी ऍम्बेसेडर म्हणून काम करण्याची विनंती केली होती. बिग बींनी व्याघ्रदूत होण्यासाठी होकार दिलाय तर सचिनने वनदूत होण्यासाठी होकार कळवलाय.

राज्यातल्या व्याघ्रपर्यटनाला चालना देण्यासाठी अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकरने पुढाकार घ्यावा अशी सरकारची इच्छा होती. त्यानुसार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 29 जुलै रोजी व्याघ्रदिनाचं औचित्य साधत अमिताभ यांना पत्र लिहिलं होतं. लोकांमध्ये व्याघ्रसंवर्धन आणि संरक्षणासाठी जनजागृती करून लोकांचा सहभाग वाढवण्याचा सरकारचा हेतू आहे. त्यानुसारच हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. अमिताभ बच्चन हा प्रस्ताव मंजूर केला होता. तर सचिन तेंडुलकरनेही आता राज्य सरकारला वनदूत होण्यासाठी उत्तर पाठवून होकार कळवलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close