राज ठाकरे यांना हजर करा : बदनापूर कोर्टाचा आदेश

December 21, 2009 1:33 PM0 commentsViews: 2

21 डिसेंबरजालना जिल्ह्यातल्या बदनापूर कोर्टाने राज ठाकरे यांना 2 जानेवारीपूर्वी कोर्टात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. 2 जानेवारीपूर्वी हजर न झाल्यास राज यांना अटक करण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत. बसवर दगडफेक केल्याप्रकरणी बदनापूर कोर्टात राज यांच्यावर खटला सुरू आहे. या खटल्यात वारंवार आदेश देऊनही राज ठाकरे हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. या अटक कारवाईला टाळाटाळ केल्याबद्दल कोर्टानं पोलिसांवर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणातला कारवाईचा अहवाल 2 जानेवारीपूर्वी कोर्टात सादर करण्याचा आदेशही दिला आहे. कोर्टाच्या आदेशामुळे राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढला आहे.

close