अनैतिक संबंधांतून महिलेसह दोन मुलांची निर्घृण हत्या

August 17, 2015 7:26 PM0 commentsViews:

belgaon news3217 ऑगस्ट : बेळगावमध्ये तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आलीये. अनैतिक संबंधांतून एकाच कुटुंबातल्या तीन जणांचा, आईसह तिच्या दोन मुलांचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला होता. याप्रकरणी प्रवीण सुब्रमण्यम भट्ट याला बेळगाव पोलिसांनी अटक केलीये. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली होती.

बेळगाव शहरातील कुवेंपूनगर भागात रीना मालगती या 37 वर्षीय विवाहितेचा गळा चिरून तर तिचा मुलगा आदित्य आणि मुलगी आयेशा यांचा बादलीत बुडवून आणि गळा दाबून निर्घृण खून झाल्याने संपूर्ण बेळगाव शहर हादरवून गेलं होतं. मयत रीना चा पती राकेश मालगती याचा कापडाचा व्यवसाय आहे आपला भाऊ विदेशातून आला असल्याने तो गेले दोन दिवस झाले गोव्याला फिरायला गेला होता.

राकेशने आपल्या घरच्या टेरेसवर पेंट हाऊस तयार केलेलं होतं. मयत रीनाचे कुवेंपूनगर मधील त्यांच्या घरच्या शेजारी राहणार्‍या प्रवीण भट्ट नावाच्या 23 वर्षी महाविद्यालयीन तरुणाशी सूत जुळले होते. गेल्या दोन वर्षांपासून त्याचं हे प्रेम प्रकरण सुरू होतं. शनिवारी मध्यरात्री रीनाने आज पती राकेश घरी नाही आहे म्हणून आरोपी प्रवीणला घरी बोलावले त्यावेळी टेरेसवर त्यांनी काळ वेळ घालविला आणि नंतर प्रवीण आपल्या घरी गेला. आणि मध्यरात्री साडे तीन वाजताच्या सुमारास प्रवीण टेरेस मार्गाद्वारे पुन्हा रीनाचा घरी आला आणि त्याने रीना आपले अनैतिक संबंध संपवूया असं सांगितलं यावेळी रीनाने संबंध तोडायला नकार दिला यावेळी रीना आणि प्रवीणमध्ये भांडण झालं. प्रवीणने रागाच्याभरात रीनाच्या गळ्यावर चाकूचा वार केला त्यात रीनाचा जागीच मृत्यू झाला भांडणाचा आवाज पाहून रीनाच्या बाजूला झोपलेली आदित्य आणि आयेशा ही दोन मुलं जागी झाली. प्रवीणने पहिलं आयेशाला बाथरूममध्ये नेऊन पाण्याच्या बादलीत बुडवून तर आदित्यचा दोरीने गळा दाबून खून केला या घटनेने या भागात एकच खळबळ माजली उडाली होती.

शनिवारी रात्री राकेशच्या घरी रीनाचा 16 वर्षी भाचा हर्ष रेडेकर देखील होता मात्र तो शनिवारी फुटबॉल खेळून घरी आला होता आणि तो रात्री 10 वाजता जेवण करून झोपी गेला होता. त्याची खोली बाहेरून बंद करण्यात आली होती. सकाळी 8 वाजता जाग आल्यावर त्याने आपल्या नातेवाईकांना दरवाजा काढायला सांगितलं. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close