‘महाराष्ट्र भूषण’बद्दल पुनर्विचार करा, अजितदादांचा यू-टर्न

August 17, 2015 8:51 PM1 commentViews:

nasik_ajit_pawar17 ऑगस्ट : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना आता दोन दिवसांत महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पण, दुसरीकडे या पुरस्काराच्या विरोधात विरोधक अधिक आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादीने आता पुरंदरेंच्या पुरस्कार देण्यावरून विरोध दर्शवलाय. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या प्रतिकूल प्रतिक्रियेनंतर आज अजित पवारांनीही आपल्याच वक्तव्यावरून घुमजाव केलंय.

बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला होता. पण, अजित पवारांनी आव्हाडांची कानउघडणी केली होती. आव्हाडांचे मत हे पक्षाचे मत नाही. पुरंदरेंना पुरस्कार दिला जातो याचं स्वागत आहे अशी भूमिका अजिदादांनी मांडली होती. पण, काका शरद पवार यांनी तटस्थ भूमिका घेतल्यामुळे अजित पवारांना माघार घ्यावी लागली. पुरस्काराचे जाहीर स्वागत करणारे अजितदादाही आता पुरस्काराबाबत पुनर्विचार व्हावा अशी सावध भूमिका घेताना दिसत आहेत. बाबासाहेब पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषणला होणारा वाढता विरोध लक्षात घेता राज्य सरकारने हा पुरस्कार देण्याबाबतच पुन्हा विचार करावा अशी भूमिका आता अजित पवारांनी घेतलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sanjay Dherange

    या पवार ब्रिगेड वर उर्फ संभाजी ब्रिगेड वर बंदी घातली पाहिजे. आधीच जातीय वाद कमी आहेत का की नव्याने ब्राह्मण आणि मराठा वाद घालत आहेत. बाबासाहेब यानीच शिवाजी महाराजांचे कार्य जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचवले. त्यांच्या वयाच्या आणि तपश्चर्येला अभिवादन करणे सोडून वाद घालत आहेत. बाबासाहेबांच्या एखाद्या मतावर मतभेद असतीलही.. पण आज पर्यंत किती इतिहासकार त्यांच्याकडे चर्चा करायला गेले?? ओबीसी आणि जातीय कार्ड खेळनार्‍या आव्हाड सारख्या नीतीशुन्य माणसाकडून आता इतिहास शिकायचा का आम्ही?? इतिहास साक्षी आहे, पुस्तकाने जितकी मस्तके फुटली नसतील तितकी या आग ओकणार्‍या मुळे फुटली. आव्हाडाला आवरा आणि ब्रिगेडला सावरा!!!

close