राम प्रधान समितीचा अहवाल सभागृहात सादर

December 21, 2009 1:44 PM0 commentsViews: 2

21 डिसेंबर 26/11ला मुंबईवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करणारा राम प्रधान समितीचा अहवाल सोमवारी सरकारने सभागृहात सादर केला. या अहवालासंदर्भात 16 सदस्यांची एक समिती स्थापन केली जाणार असल्याचं गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सांगितलं. आयबीएन नेटवर्कने हा अहवाल देशहितासाठी याधीच जनतेसमोर मांडला होता. आयबीएन लोकमतने जाहीर केलेला अहवाल सत्य असल्याची कबुलीही सरकारने सभागृहात दिली आहे. दोषींवर करवाई करा – एकनाथ खडसेराज्य सरकारने चौकशी करून पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे, तसेच अहवाल फुटल्याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

close