मराठवाड्यातले माथाडी कामगार 18 दिवसांपासून संपावर

December 22, 2009 11:03 AM0 commentsViews: 3

22 डिसेंबर रेल्वे प्रशासनाच्या बघ्याच्या भूमिकेमुळे गेल्या 18 दिवसांपासून औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेडच्या मालधक्क्यावरील हमाल आणि माथाडी कामगारांचा संप सुरूच आहे. त्यामुळे या चार जिल्ह्यांतले चार हजार कामगार बेकार झालेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची रेल्वे मालवाहतूक ठप्प झाली आहे. सिमेंट, खतं आणि अन्नधान्य 24 तासात उतरवणं शक्य होत नाही. या संपामुळे मोठ्या प्रमाणात सिमेंटची आवक घटल्याने शहरात सिमेंटचे भाव वाढले आहेत. शिवाय इथं काम करणार्‍या हमालांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावर रेल्वे प्रशासन आणि संपकर्‍यांत कोणताही तोडगा अजूनही निघालेला नाही. याबाबत रेल्वे प्रशासन आणि कामगार युनियन यांच्यात एक बैठक झाली, पण त्यामध्ये काहीही तोडगा निघू शकला नाही.

close