‘टिनपाट तहलका’, सामनातून तहलकावर टीकास्त्र

August 18, 2015 11:00 AM0 commentsViews:

Saamna uddhav

18 ऑगस्ट : एका टिनपाट आणि बदनाम साप्ताहिकाने शिवसेनाप्रमुखांविषयी छापलेला आक्षेपार्ह मजकूर हा तेजस्वी सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी ‘तहलका’ साप्ताहिकावर केली आहे. त्याचबरोबर अशा विकृतांना प्रसिद्धीचा आनंद मिळू नये यासाठी संयम पाळण्याचे आवाहन करतानाच जनतेचा संताप ज्वालामुखी सारखा उफाळून आल्यास तहलकाच्या मढय़ास ते भरबाजारात तुडवतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शिवसेनेने आज (मंगळवारी) ‘सामना’च्या अग्रलेखातून ‘तहलका’चा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. तहलकाने शिवसेनाप्रमुखांना ‘दहशतवादी’ ठरवून स्वत:च्या प्रसिद्धीचा कंडू शमविण्याचा प्रयत्न केला आहे. लैंगिक शोषण, विनयभंग, बलात्कार इशा प्रकारांमुळे बदनाम झालेल्या व लोकांनी जोडे मारल्याने अर्धमेले झालेले तहलका साप्ताहिकाचे मढे जनतेने मातीत गाडले. मात्र, त्यानंतरही ते स्वत:च वर येऊन प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करीत होते. या मढय़ाचा हा प्रयत्न साफ फसला आहे. विकृतीचा आनंद अशा टिनपाटांना मिळू नये. तसंच या टिनपाटांची थोबाडे थुंकण्याच्याही लायकीचे नसल्याने काही काळ शांत राहण्याचे आवाहन करतानाच जनतेचा संतापाचा ज्वालामुखीसारखा उसळला तर ते अशा मढय़ास भरबाजारात तुडवतील, असा इशाराही शिवसेनेने तहलका साप्ताहिकास दिला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close