राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी शुभ्रा मुखर्जींचं निधन

August 18, 2015 12:06 PM0 commentsViews:

suvra-mukherjee

18 ऑगस्ट : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पत्नी शुभ्रा मुखर्जीची यांचं आज (मंगळवारी) सकाळी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. दिल्लीतल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. राष्ट्रपती भवनातून ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. गेल्या नऊ दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, आज सकाळी 10.51 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रणव मुखर्जी दोन दिवसांच्या ओडिशा दौर्‍यावर असतानाच शुभ्रा मुखर्जी यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे आपला दौरा अर्धवट सोडून ते नवी दिल्लीला परतले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close