मुंबईत दोन दिवस पाणीकपात

December 22, 2009 11:05 AM0 commentsViews: 1

22 डिसेंबर मुंबईकरांना दोन दिवस पाणीकपातीला तोंड द्यावं लागणार आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीमुळे पाणीकपातीत 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून बुधवारी 11 वाजेपर्यंत मुंबईत 25 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. जुन्या तानसा पूर्व आणि पश्चिम पाईपलाईन्सना नवीन पाईपलाईन्स सोबत जोडण्याचं काम सुरू आहे. तसेच पाईप गळतीच्या दुरुस्तीचं कामदेखील करण्यात येणार आहे. त्यामुळेच ही कपात करण्यात आल्याचं महापालिकेने सांगितलं आहे. ही कपात मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरातल्या नागरिकांना सोसावी लागणार आहे.

close