नेमाडे साहित्यातले दहशतवादी होऊ पाहत आहेत, ‘पानिपत’कारांचा घणाघात

August 18, 2015 7:51 PM2 commentsViews:

patil on nemade18 ऑगस्ट : जे नेमाडे आचार्य अत्रे, वि.स. खांडेकर यांना साहित्यक मानत नव्हते. जे नेमाडे कुसमाग्रजांचा उद्धार करायचे तेच नेमाडे कुसमाग्रजांच्या नावे देण्यात आलेला दीड लाखांचा पुरस्कार घेण्यासाठी पुढे आले. जे पु.लं. देशपांडेची चेष्टा करता ते नेमाडे आज साहित्य क्षेत्रातील दहशतवादी बनू पाहत आहे अशी घणाघाती टीका पानिपतकार विश्वास पाटील यांनी केली.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वादात आता ‘पानिपात’कार विश्वास पाटील यांनीही उडी घेतलीये. विश्‍वास पाटील यांनी बाबासाहेब पुरंदरेंचं समर्थन करण्यासाठी आज एक पत्ररकार परिषद घेतली. या सगळ्या प्रकरणाला जातीयवादाचा वास येतो, असा गंभीर आरोप विश्वास पाटील यांनी केला. पुरस्कार न देण म्हणजे गिरीप्रेमी, दुर्ग प्रेमींचा अपमान आहे असं परखड मतही विश्वास पाटील यांनी व्यक्त केलं. पुरस्कार समारंभाला गालबोट लावायचं कारण नाही, असंहीही त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्याकडे वळवला. जे नेमाडे आचार्य अत्रे, वि.स. खांडेकर यांना साहित्यक मानत नव्हते. जे नेमाडे कुसमाग्रजांचा उद्धार करायचे तेच नेमाडे कुसमाग्रजांच्या नावे देण्यात आलेला दीड लाखांचा पुरस्कार घेण्यासाठी पुढे आले.जे पु.लं. देशपांडेची चेष्टा करता ते नेमाडे आज साहित्य क्षेत्रातील दहशतवादी बनू पाहत आहे अशी टीका पाटील यांनी केली. तसंच नेमाडे यांनी अनेक विद्यापीठात आणि महाविद्यालयांमध्ये मोठ्या चलाखीने आपल्या शाखा स्थापन केल्या आहे असा आरोपही त्यांनी केला. नेमाडे आज शिवाजी महाराजांवर बोलत आहे ते अत्यंत हास्यास्पद आहे. नेमाडे यांनी आपल्यासोबत शिवाजी महाराजांवर जाहीर चर्चा करावी असं जाहीर आव्हानच पाटील यांनी दिलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Bapu Raut

    आता पर्यंत चूप बसलेले विश्वास पाटील कसे काय पुरंदरेचे समर्थन करतात.? त्यांना आजपर्यंत ब्राम्हण वाद्याकडून मिळाले त्याची ते परत फेड करतायत असे दिसते.

  • Bapu Raut

    राज ठाकरे हे ब्राम्हण जातीचा उल्लेख करून जातीय राजकारण करतात. ते तांडव करण्याची भाषा करतात. परंतु राज ठाकरेच्या पाठीमागे कोण व किती लोक आहेत याचा त्यांनी विचार करावा.

close