प्रधान समितीचा अहवाल फुटल्याची सीबीआय चौकशी करा -शिवसेना

December 22, 2009 11:07 AM0 commentsViews: 2

22 डिसेंबरराम प्रधान अहवाल कसा फुटला याबाबत सीबीआय चौकशी करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. त्यासाठी मंगळवारी विधिमंडळासमोर शिवसेनेतर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली. 26/11च्या हल्ल्याविषयीचा राम प्रधान समितीचा अहवाल सोमवारी सरकारने सभागृहात ठेवला. आयबीएन नेटवर्कने हा अहवाल देशहितासाठी याधीच जनतेसमोर मांडला होता. आयबीएन-लोकमतने जाहीर केलेला अहवाल खरा असल्याची कबुलीही सरकारने सभागृहात दिली.

close