महाराष्ट्रभूषणवरुन संभाजी ब्रिगेडचा राडा, पंढरपुरात बस पेटवली

August 18, 2015 6:24 PM1 commentViews:

pandharpur_bus_418 ऑगस्ट : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना देण्यात येणार्‍या ‘महाराष्ट्र भूषण’ वरून संभाजी ब्रिगेड आक्रमक झालीये.संभाजी ब्रिगेडने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलंय. अहमनगरमध्ये गृह राज्यमंत्री राम शिंदे यांच्या ऑफिसच्या तोडफोडीनंतर पंढरपूरमध्ये बस पेटवण्यात आलीये.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा वाद आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचलंय. आज दुपारी अहमदनगरमध्ये  संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गृहराज्य मंत्री राम शिंदेंचं कार्यालय फोडलं, तूफान दगडफेकीत कार्यालयाच्या काचा फुटल्या आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी पत्रक फेकून पोबारा केला. या पत्रकांमध्ये आज फक्त कार्यालयावर कारवाई, उद्या पुरंदरेला महाराष्ट्र भूषण देताल तर खबरदार, अशी धमकी देण्यात आलीये. तर पंढरपूरमध्ये ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एसटी बस पेटवली. 10 मोटरसायकलवरुन आलेल्या कार्यकर्त्यांनी पुरंदरे आणि राज ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणाबाजी करत पेट्रोल ओतून बस पेटवली. पंढरपूर-कोल्हापूर या बस मधील सर्व प्रवासी सुखरुप आहे. घटनास्थळी अश्लील शिवीगाळ करणारी पत्रके टाकून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पसार झाले. या बसमधले सर्व प्रवासी सुरक्षित आहे. बस पेटवल्यानंतर कार्यकर्ते पळून गेले.

तर, महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करण्याचा ठराव उस्मानाबाद जिल्हातील अनेक ग्रामपंचायतीनं केलाय. एकट्या लोहारा तालुक्यात 26 ग्रामपंचायतीनं हा ठराव मंजूर केला आणि याच्या प्रती मुख्यमंत्र्यांना ई मेल करण्यात आलीये. या स्वरुपाची पाच हजार पत्रे मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे. पुरस्कार रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Kalpesh Bhogale

    Kadak karvai karrraa vasul karraaa

close