आमदार रमेश कदम राष्ट्रवादीतून निलंबित

August 18, 2015 7:47 PM0 commentsViews:

ramesh_kadam18 ऑगस्ट : अखेर राष्ट्रवादीने रमेश कदम यांना पक्षातून निलंबित केलंय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही घोषणा केलीय. अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीने ही कारवाई केलीय.

रमेश कदम यांच्यावर 185 कोटींच्या गैरव्यवहार केल्या प्रकरणी काल पुण्यातून अटक करण्यात आली. महिनाभर रमेश कदम फरार होते. त्यानंतर सीआयडीच्या पथकाने पुण्यातील ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये कदमांना अटक केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close