सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या

August 18, 2015 9:24 PM0 commentsViews:

buldhana news318 ऑगस्ट : सासरच्या छळामुळे बुलडाण्यात एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केलीये. महत्वाचं म्हणजे बेकायदेशीररित्या केलेल्या गर्भलिंग चाचणीत मुलगी असल्याचं कळताच सासरच्या मंडळीनी या डॉक्टर महिलेचा छळ केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणात पोलिसांनी प्रणिताचा नवरा डॉ.सचिन भारुका ला अटक केलीय.

बुलडाण्यातील ओम प्रकाश अग्रवाल यांची मुलगी प्रणिता हीचं लग्न यवतमाळ जिल्हातील उमरखेड इथल्या डॉ सचिन भारुका याच्यासोबत झालं होतं. प्रणिताचा नवरा डॉ.सचिन हा नेहमीच सासरकडून उच्चशिक्षणासाठी पैसै मागायचा. यापूर्वी सचिनला 60 लाख रुपये दिले.

मात्र, सात महिन्यांपूर्वी प्रणिताला गर्भधारणा झाली, तिची अनाधिकृत केलेल्या गर्भलिंग चाचणीत प्रणिताला मुलगी असल्याचं कळालं. त्यानंतर प्रणिताला भयंकर त्रास देण्यास सुरुवात झाली.

तिला नग्न करुन मारहाण होत असल्याचंही प्रणिताच्या वडिलांनी आरोप केलाय. शेवटी या सर्व छळाला कंटाळून प्रणितानं गळफास घेवून आत्महत्या केली. मृत्युपुर्व लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत प्रणितानं तिच आणि तिच्या होणार्‍या मुलीचं भविष्य चांगले नसल्याचं म्हटलंय. या प्रकरणात पोलिसांनी प्रणिताच्या नवर्‍याला अटक केली असून सासू आणि इतर आरोपींना लवकरचं अटक होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close