सईद चाऊसचा कुस्ती सोडण्याचा इशारा

December 22, 2009 11:10 AM0 commentsViews: 115

22 डिसेंबर महाराष्ट्र केसरीच्या अंतिम कुस्तीत आपल्यावर खूप दडपण होतं, आपल्याला धमकावलं गेलं होतं असा आरोप कुस्तीपटू सईद चाऊस याने केला आहे. या प्रकरणात आपण पोलिसांकडे तक्रार नोंदवल्याचंही चाऊसने सांगितलं आहे. आपल्यास न्याय मिळाला नाही तर कुस्ती सोडण्याचा इशारा चाऊसने दिला आहे. पुण्याच्या विजय बनकरने बीडच्या सईद चाऊसचा पराभव करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. पण हा किताब विजय बनकरने रडीचा डाव टाकत पटकावला असल्याचा आरोप सईद चाऊसने केला आहे. याशिवाय सलग दोन वेळा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावणार्‍या चंद्रहार पाटीलनेही आपल्याला धमकावण्यात आल्याचा आरोप केला आहे.

close