कसाबचा खोटारडेपणा सुरूच

December 22, 2009 1:42 PM0 commentsViews: 4

22 डिसेंबर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या घेण्यात आलेल्या नावांपैकी मी कोणालाही ओळखत नाही. लाहोरला अनेक वेळा माझ्या कामासाठी गेलो होतो, कुठल्याही ट्रेनिंगसाठी नाही. लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उल-दवा या संघटनांशी माझा काहीही संबंध नाही. मी पंजाब प्रांतातील सराए-आलमगीर या ठिकाणी कॅटरिंगचं काम करायचो असा जबाब अजमल कसाबने नोंदवला आहे. अमरसिंग सोलंकीला आपण मारलेलं नाही तसेच कोर्टात दाखवलेले कपडे माझे नाहीत. पोलिसांनी सादर केलेल्या आयकार्डवरचा फोटोही आपला नाही. माझ्याजवळच्या नोटा स्वच्छ होत्या. कोर्टात दाखवलेल्या नोटा दुसर्‍याच आहेत. सॅटेलाइट फोन, जीपीएस नोटबुक याचे फोटो पोलिसांनीच मला दाखवले. बोटीवर सापडेल्या वस्तू कोळ्यांच्या किंवा स्मगलर्सच्या असाव्यात, असं कसाबने म्हटलं आहे.

close