महिलेला पोपट करतोय शिवीगाळ, पोलिसांत तक्रार

August 18, 2015 11:09 PM0 commentsViews:

18 ऑगस्ट : लालचुटुक चोच आणि हिरवागार रंग असलेला पोपट सगळ्यांनाच आवडतो. पण, हाच पोपट शिवीगाळ करतो म्हणून त्याची चंद्रपुरातल्या एका महिलेसाठी इतका त्रासदायक ठरलाय की तिनं चक्क या पोपटाची तक्रार राजुरा पोलीस ठाण्यात केलीये.

popatभाऊराव वाटेकर यांच्याकडचा हा पोपट… हा पोपट बोलका आहे. बोलणारा हा पोपट तसा कुतूहलाचा विषय पण भाऊराव वाटेकरांच्या शेजारी जनाबाई साखरकर (60) यांनी या पोपटाविरोधात दररोज शिवीगाळ करत असल्याचा आरोप आपल्या तक्रारीत केला आहे. रावण प्रजातीचा हा पोपट सारखा आपल्याला शिवीगाळ करतो असं त्या म्हणतात. याला वैतागून जनाबाईंनी पोलिसांत तक्रार केलीये. यामुळं आधी पोलीसही चक्रावलेत. पोलिसांनी पोपटाला बोलतं करण्याचा प्रयत्न केला पण आता पोपटपंची बंद झालीये, त्यामुळे आता पोलिसही वाट पाहतायत, पोपट कधी शिवीगाळ करतोय त्याची…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close