अखेर दलित गावकर्‍यांची बहिष्कारातून सुटका

August 18, 2015 11:47 PM0 commentsViews:

amravati_news3318 ऑगस्ट : अमरावतीमध्ये चिंचोली ब्राह्मणवाडी गावातल्या दलितांवरच्या बहिष्कारासंबंधी अखेर प्रशासनाला जाग आलीये. अमरावतीचे जिल्हाधिकारी, एसपी यांनी 15 ऑगस्टला या गावाला भेट दिली, त्यानंतर सोमवारी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी एस थुल यानी गावकर्‍यांची बैठक घेतली आणि दोन्ही बाजूचे म्हणणे एकूण घेतलं.

प्रामुख्याने जागेच्या वादातून हा द्वेष निर्माण झाला असल्याच त्यांच्या लक्षात आलं. 2 सप्टेंबरला या जागेची मोजणी होणार आहे. त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. आता बहिष्कार मिटला आहे, मात्र दलिताना कोणी काम देत नसेल तर मनरेगामार्फत त्यांना काम देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधिनी वेळीच योग्य पावलं उचलली असती तर ही वेळ आलीच नसती असंही सी एस थुल म्हणालं. गेल्या वर्षभरापासून या गावात दलितांवर बहिष्कार टाकण्यात आला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close