FTII मध्ये अटकनाट्य, मध्यरात्री विद्यार्थ्यांना केली अटक

August 19, 2015 1:36 PM0 commentsViews:

19 ऑगस्ट : पुण्यातील फिल्म अँड इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII)च्या पाच विद्यार्थ्यांना डेक्कन पोलिसांनी अटक केलीय. एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी पंधराहून अधिक विद्यार्थ्यांविरुद्ध डेक्कन पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यावरुन ही कारवाई करण्यात आलीय. पण आश्चर्याची बाब म्हणजे मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केलीय.FTII students arrested

गुन्हा नोंद केलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार असल्याचं पोलिसांनी सांगितलं, मात्र त्यापैकी केवळ पाच विद्यार्थ्यांनाच अटक केली गेलीय. त्यांना आज सकाळी 11 वाजता कोर्टात हजर करण्यात आलं. सोमवारपासून 2008 च्या बॅचच्या प्रकल्प मूल्यांकनाला सुरुवात झाली. प्रोजेक्ट आहे त्या स्थितीत सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेत संचालक प्रशांत पाठराबे यांच्या कार्यालयात तब्बल सहा तास ठिय्या मांडला होता.. आमच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाल्याशिवाय पाथराबेंना कार्यालयाबाहेर जाऊ दिलं जाणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती. अखेरीस रात्री साडेनऊनंतर पोलिसांना पाचारण करुन पाठराबे यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी दिवसभर काहीच घडलं नाही. मात्र, रात्री साडे अकरा वाजता पाठराबे यांच्या तक्रारीवरुन डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला, त्यानंतर पोलीस विद्यार्थ्यांच्या अटकेसाठी एफटीआयआय कँम्पसमध्ये पोहोचले आणि एकच गोंधळ उडाला. एफटीआयआय आंदोलनाचा मंगळवारी 68 वा दिवस होता. विद्यार्थ्यांचं अटक सत्र सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांनी आंदोलन दडपत असल्याचा आरोप केला.

दरम्यान या वादावर सेलिब्रिटी आणि दिग्गजांनी ट्विटरवर प्रतिक्रिया नोंदवलीये

जगप्रसिद्ध साऊंड रेकॉर्डिस्ट रेसुल पोकुट्टी म्हणतात, “या वादावर कसा तोडगा काढावा, यावर माहिती प्रसारण मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी रात्री 8 वाजता माझ्याशी सविस्तर चर्चा केली आणि आम्ही काही दिवसांतच FTIIमध्ये येऊ असं सांगितलं. मग मध्यरात्री अशी अटक का केली?”

उपाध्यक्ष राहुल गांधी
– आंदोलनकर्त्या FTIIच्या विद्यार्थ्यांना मध्यरात्री अटक केली. मोदीजी, आमचे विद्यार्थी गुन्हेगार नाहीयेत. शांत करा, निलंबित करा. अटक करा. अच्छे दिनसाठी हा मोदींचा मंत्र आहे.

विद्यार्थ्यांवर आरोप

- दंगल माजवणे
– सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे
– जाणीवपूर्वक नुकसान पोहोचवणे
– धमकावणे
– बळजबरीने रोखून धरणे
– बेकायदा गर्दी करणे

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close