पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण हा शिवरायांच्या कार्याचाच गौरव, सेनेची स्तुतीसुमनं

August 19, 2015 1:59 PM0 commentsViews:

19 ऑगस्ट : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करून सरकारने शिवाजी महाराजांच्या कार्याचाच गौरव केला आहे अशा शब्दात शिवसेनेनं बाबासाहेब पुरंदरेंवर स्तुतीसुमनं उधळलीये. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वादावर शिवसेनेनं बाबासाहेब पुरंदरेंच्या भक्कमपणे पाठीशी राहत ‘आज रायगडावरही आनंदोत्सव असेल’ असं सांगतं आपली भूमिका ‘सामना’तून स्पष्ट केलीये. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जितेंद्र आव्हाड, भालचंद्र नेमाडे आणि दाभोलकर यांच्यावर टीका करण्यात आलीये.sena on uddhav4

शिवसेना आपलं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून बाबासाहेब पुरंदरेंवर स्तुतीसुमनं उधळलीये. शिवशाहीर हा महाराजांचा माणूस आहे. छत्रपतींना मुजरा करीतच ते या महाराष्ट्र भूमीवर अवतरले. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करून सरकारने शिवाजी महाराजांच्या कार्याचाच गौरव केला आहे. रायगडावरून शिवाजी महाराजही आनंदाने या सोहळ्यावर फुले उधळतील. आज शिवचरित्र पुन्हा पावन झाले असं या लेखात म्हटलंय. तर दुसरीकडे पुरस्काराला विरोध करणार्‍या विरोधकांचा खरपूस समाचार घेण्यात आलाय. महाराष्ट्राच्या जनमानसात काडी इतकीही किंमत नसलेले करंटे लोक शिवशाहिरांना विरोध करीत आहेत. महाराष्ट्र मात्र शिवशाहिरांवर बेहद्द खूश आहे. शिवाजी महाराजांना जातीय करण्याचे हे कारस्थान उधळून लावण्याची गरज असताना स्वत:स जाणते समजणारे राजकारणी या वादात तेल ओतण्याचे काम करीत आहेत. महाराष्ट्रात जन्म घेऊन ज्यांचा महाराष्ट्रास कणभरही लाभ झाला नाही असे काही लोक शिवशाहिरांना देण्यात येणार्‍या पुरस्काराविरोधात आपल्या पिचक्या मांडीवर थाप मारून आव्हानांची भाषा करीत आहेत. पुरंदरे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा सगळ्यात तिरस्करणीय चेहरा जितेंद्र आव्हाड यांनी म्हणे रान उठवले आहे. राष्ट्रवादीच्या या माकडाचे कर्तृत्व काय? पिसाळ, खोपडे अशा लोकांनी तेव्हा शिवरायांना विरोध केलाच होता. त्यांचीच ही औलाद नेमाडे, आव्हाड, दाभोलकर, विखे-पाटील नावाने बेइमानी करीत आहे अशी विखारी टीका करण्यात आलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close