FTII च्या अटकनाट्याची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

August 19, 2015 3:07 PM0 commentsViews:

ftii arrest issiu19 ऑगस्ट : एफटीआयआयमधल्या अटकनाट्याची केंद्रानं दखल घेतलीय. मंगळवारी रात्री नेमकं काय झालं याचा तपास करण्यासाठी केंद्र सरकारचं एक पथक पुण्यात येणार आहे. IBN नेटवर्कला सूत्रांनी ही माहिती दिलीय. विद्यार्थ्यांनी FTIIचे संचालक प्रशांत पाठराबे यांना घेराव घालण्याच्या घटनेचीही केंद्रानं गंभीर दखल घेतल्याचं समजतंय.

काल मंगळवारी मध्यरात्री पाच विद्यार्थ्यांना डेक्कन पोलिसांनी अटक केलीय. प्रशांत पाठराबे यांनी सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी पंधराहून अधिक विद्यार्थ्यांविरुद्ध डेक्कन पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यावरुन ही कारवाई करण्यात आलीय. दरम्यान, या वादात आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही उडी घेतलीय. हा वाद सुटेपर्यंत तुम्ही तुमचे वर्ग दिल्लीत भरवू शकता, असा प्रस्ताव केजरीवाल यांनी विद्यार्थ्यांसमोर ठेवलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close