पाकच्या कुरापत्या सुरूच, फुटीरतावादी हुरियतच्या नेत्यांना भेटीचं निमंत्रण

August 19, 2015 4:24 PM0 commentsViews:

pakisstan3444319 ऑगस्ट : सीमेवर गोळीबाराच्या घटनेनंतरही पाकिस्तानच्या कुरापतीपणा सुरूच आहे. 23 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज नवी दिल्लीत येणार आहेत. ते भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा करतील. याच दिवशी काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांना पाकिस्ताननं अजीज यांची भेट घेण्याचं निमंत्रण दिलंय.

हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवेझ उमर फारूक यांना मंगळवारी भारतातल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयातून फोन करण्यात आला. तसंच सय्यद अली शाह गिलानी आणि यासिन मलिक यांनाही पाकनं निमंत्रित केलंय. गेल्या वर्षीही याच कारणामुळे भारतानं सुरक्षा सल्लागार पातळीवरची बोलणी रद्द केली होती. पण पाकनं यावरून काही धडा घेतलेला दिसत नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close