केंद्रीय मंत्र्यांना कुटुंब, मित्रपरिवारासह विमानप्रवास मोफत

December 22, 2009 1:46 PM0 commentsViews: 2

22 डिसेंबर राज्यसभेत मंगळवारी केंद्रीय मंत्री आणि त्यांचे कुटुंबीयच नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांनाही मोफत विमान प्रवास करायला मिळणार असं विधेयक मंजूर करण्यात आलं. विशेष म्हणजे हे विधेयक कोणत्याही चर्चेशिवाय राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. लोकसभेतही यापूर्वीच हे विधेयक कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर झालं होतं. या विधेयकानुसार वर्षातून 48 वेळा मंत्री आणि त्यांच्या नातेवाईकांना देशांतर्गत फुकटात विमान प्रवास करता येणार आहे.

close