विरोधकांच्या दबावामुळे राम प्रधान अहवाल सभागृहात मांडला -एकनाथ खडसे

December 23, 2009 11:28 AM0 commentsViews: 3

23 डिसेंबर विरोधकांच्या दबावामुळेच सरकारने राम प्रधान समितीचा अहवाल सभागृहात सादर केला, पण हा अहवाल फुटला कसा हे सिद्ध होणं गरजेचं आहे. याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनाचं सूप बुधवारी वाजलं. अधिवेशनातल्या कामकाजाचा आढावा यावेळी विरोधकांनी घेतला. विदर्भात अधिवेशन होत असूनही विदर्भवासीयांच्या तोंडाला सरकारने पानं पुसल्याचा आरोप विरोधकांनी केला. सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकारकडे कोणताही कालबद्ध कार्यक्रम नाही. त्याचबरोबर महागाई रोखण्यातही सरकारला अपयश आलं आहे, अशी टीका विरोधी पक्षाने केली.

close