‘ती’ला सापासोबत खेळायला आवडतं !

August 19, 2015 10:00 PM0 commentsViews:

19 ऑगस्ट : साप म्हटलं की चांगल्या चांगल्यांची भंबेरी उडते.. पण, बुलडाणामध्ये एक महिला चक्क हातात साप धरून त्याच्याशी विविध खेळ खेळते. बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर इथली ही महिला आहे…वनिता बोरडे असं तिचं नाव आहे. सर्पकन्या या नावाने तिची परिसरात ओळख आहे.

sarpkanyaसापाबरोबर खेळणे हा तिचा छंद आहे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून सापाबरोबर मैत्री केल्यानंतर आता ही महिला विषारी सापही सहज पकडू शकते. तसंच, या सपाला पकडून त्याला मारण्याऐवजी ती जंगलात सोडून देते. त्यामुळे तब्बल 51 हजार सापांना जीवदान मिळालंय. साप हा अतिशय गरीब आणि भित्रा प्राणी आहे त्याच्याशी मैत्रीने वागावे असा सल्ला तिनं आज नागपंचमीच्या निमित्ताने दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close