शहीद हेमंत करकरे यांचं जॅकेट कचर्‍यात टाकलं

December 23, 2009 11:31 AM0 commentsViews: 55

23 डिसेंबर शहीद हेमंत करकरे यांचं जॅकेट हॉस्पिटलच्या कचर्‍याच्या पेटीत टाकण्यात आलं. तिथून ते देवनारच्या डंपिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात आलं, असा जबाब महानगर दंडाधिकारी ई.एस. पलांडे यांच्यासमोर सफाई कर्मचार्‍याने दिला आहे. करकरे शहीद झाल्यापासून त्यांचं जॅकेट गहाळ आहे. त्याबाबत करकरेंच्या पत्नी कविता करकरे यांनी माहिती मागितली होती, पण पोलिसांकडे त्याबाबत कुठलीही माहिती नव्हती.

close