दुरुस्तीच्या कामामुळे एक्स्प्रेस-वेची वाहतूक जुन्या मार्गाने

August 20, 2015 8:58 AM0 commentsViews:

mumbai pune express

20 ऑगस्ट : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आज (गुरूवारी) पुन्हा एकदा वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. आज आडोशी बोगद्याजवळ दरडी काढण्याचं काम केलं जाणार असल्याने एक्स्प्रेस-वेवरच्या वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

आडोशी बोगद्याजवळ आज पुन्हा दुरुस्तीचं काम चालणार आहे. या कामाचा पुण्याहून मुंबईकडे येणार्‍या वाहतुकीवर परिणाम होणार नसला तरी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सकाळी 11 ते 4 या वेळेत खालापूर टोलनाक्याजवळ अवजड वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली असून लहान गाड्यांची वाहतूक खंडाळा बोगद्याजवळून जुन्या मार्गाने वळवण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांत एक्स्प्रेस-वेवर दरड कोसळण्याच्या सत्रामुळे आजच्या वाहतूक बदलानंतरही काही काळ वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close