‘FTII’च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मुंबई विद्यापीठाचा पाठिंबा

August 20, 2015 11:47 AM0 commentsViews:

MUMBAI UNIVERSITY AND FTII

20 ऑगस्ट : एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. देशभरातून या विद्यार्थ्यांना पाठिंबा मिळत असतानाच मुंबई विद्यापीठानंही या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसच्या गेटवर विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली. या निदर्शनामध्ये शिक्षक आणि एफटीआयआयचे माजी विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली.

एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठराबे यांना घेराव घातल्या प्रकरणी 5 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. प्रशांत पाठराबे यांनी सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी पंधराहून अधिक विद्यार्थ्यांविरुद्ध डेक्कन पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यावरुन मंगळवारी मध्यरात्रीच्या ‘एफटीआयआय’मध्ये अटकनाट्य घडले होते. या पाचही विद्यार्थ्यांना जामीन मंजूर झाला आहे.

दरम्यान, ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांचे गेल्या 69 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पाश्‍र्वभूमीवर केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तीनसदस्यीय समिती नियुक्ती केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close