फुटीरतावादी नेते गिलानी आणि मीरवाईज नजरकैदेत

August 20, 2015 1:05 PM0 commentsViews:

Farooq-Gilani

20 ऑगस्ट : भारत-पाकिस्तान यांच्यातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चेपूवच्च जम्मू-काश्मीरचे फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी, मीरवाईज फारूख आणि यासिन मलिक यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. याशिवाय पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावणारा फुटरीरतावादी नेता आसिया अंद्राबी याच्या घरावरही पोलिसांनी छापा मारला.

भारत-पाकिस्तान यांच्यातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची प्रस्तावित बैठक येत्या 23 ऑगस्ट रोजी होत आहे. त्यासाठी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ हे भारत भेटीवर येत असून, ते भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोबाल यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. मात्र, ही चर्चा होण्यापूर्वी पाकिस्तानकडून जम्म-काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांना चर्चेसाठी भेट घेण्याचे निमंत्रण देण्यात आलं. पाकिस्तानच्या या कुरापतीमुळे भारत नाराज आहे. यापार्श्वभूमीवर फुटरीतावादी नेत्यांची धरपकड करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही देशांमधील 23 ऑगस्टच्या चर्चेवर अनिश्चिततेचं सावट निर्माण झाले आहे.

दरम्यान, फुटरीतावाद्यांना नजरकैदेत ठेवल्याबद्दल जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचा निषेध केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close