शिशिर शिंदे यांचं निलंबन तात्पुरतं मागे

December 23, 2009 11:33 AM0 commentsViews: 1

23 डिसेंबर मनसेचे आमदार शिशिर शिंदे यांचं निलंबन तात्पुरतं मागे घेण्याचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला. शपथविधीच्या अधिवेशनात शिशिर शिंदे यांनी शपथ घेण्यापूर्वीच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. निलंबनाची कारवाई पूर्ण करण्यासाठी शिशिर शिंदे यांनी शपथ घेणं गरजेचं आहे म्हणूनच शिंदे यांना बुधवारी शपथ देण्यात येईल. त्यानंतरच त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल. अबू आझमी यांनी हिंदीतून शपथ घेतल्याने धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिंदे यांच्यासह मनसेच्या 3 आमदारांचं निलंबन झालं होतं. दरम्यान, मनसेच्या आमदारांचं निलंबन मागे घेतल्यास जनता सरकारचा धिक्कार करेल, अशी प्रतिक्रिया अबू आझमी यांनी दिली आहे.

close