चोर समजून परप्रांतीयांना बेदम मारहाण

August 20, 2015 6:09 PM0 commentsViews:

kolhapur_marahan20 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या चोरांच्या सुळसुळाटानं गावागावामध्ये गस्त घातली जात आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातल्या हळदी आणि आंबेवाडी गावात परप्रांतीयांना चोर समजून बेदम मारहाण करण्यात आलीय. या मारहाणीत 11 जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

कागलमधल्या पशुखाद्याच्या एका कारखान्यात हे परप्रांतीय कामगार काम करतात. कामावरुन रात्रीच्या वेळी उशीरा परतताना त्यांच्यावर गस्त घालणार्‍या जमावानं हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली. भाषेच्या अडचणीमुळे या कामगारांना नीट बोलता येत नव्हतं.

त्यामुळं जमावाला संशय आला आणि ही मारहाण करण्यात आली. अशा घटना जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांनीही आता गस्त घालणार्‍यांवरच कडक कारवाई करण्याचा इशारा दिलाय.

सध्या करवीर तालुक्यातल्या 38 गावांमध्ये पोलिसांची गस्त सुरू असून अनेक गावांमध्ये तरुण आणि ग्रामस्थही गस्त घालत आहेत. पण याच दरम्यान अनेक जण अफवा पसरवत असल्यामुळं नागरिक आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी गाड्या अडवून चौकशी केली जात आहे, फिरस्त्यांचीही गस्त घालणारे चौकशी करत आहेत. पण त्यातून चोर नसलेल्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे आता गस्त घालणार्‍यांनी शहानिशा करावी अशी मागणी होतेय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close