राज ठाकरे यांच्या अटकेला औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती

December 23, 2009 11:35 AM0 commentsViews: 2

23 डिसेंबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेला औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे.तसेच 4 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने सरकारी पक्षाला दिले आहेत. 21 ऑक्टोबर 2008 रोजी जालना जिल्ह्यातल्या राजूर इथं मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगफेक केली होती. त्याविरोधात बदनापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी राज ठाकरे यांना 5 डिसेंबरपर्यंत हजर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानंतर राज ठाकरे हजर न झाल्याने 21 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत राज यांना अटक करण्याचे आदेश बदनापूर कोर्टाने दिले होते.

close