कल्याण डोंबिवली पालिकेत नगरसेवकांचा राडा

August 20, 2015 7:15 PM0 commentsViews:

kdmc_palika3420 ऑगस्ट : कल्याण डोंबिवली महापालिका महासभेत नगरसेवकांनी राडा घातलाय. विरोधी पक्षनेते पदाच्या विषयावरून महासभेत गदारोळ झाला. आज केडीएमसीच्या महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या गदारोळात विरोधी पक्ष नेतेपदाच्या जागेचा ताबा उदय रसाळ यांनी घेतलाय.

काँग्रेसचे विरोधीपक्षनेते शिवसेनेत गेल्याने काँग्रेसनं त्याचं नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करत सभाग्रहात मोठा गोंधळ घातला.पण सत्ताधारी शिवसेनेच्या महापौरांनी विश्वनाथ राणेंचं विरोधी पक्षनेतेपद कायम ठेवलं. त्यातूनच हा केडीएमसीत हा सगळा गोंधळ उडालाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close