अखेर बिबट्या जेरबंद

August 20, 2015 9:17 PM0 commentsViews:

20 ऑगस्ट :  नाशिकमध्ये जय भवानी रोडवर असलेल्या बंगल्यातील आवारात एक बिबट्या शिरला होता. बिबट्या बंगल्यात शिरल्याची बातमी हा हा म्हणत गावभर पसरली. बिबट्या दिसल्यामुळे बंगल्यातील राहणार्‍यांनी घरातून एकच धूम ठोकली. बराच काळ बिबट्यांनी बंगल्यात मुक्काम ठोकला. या परिसरातील रहिवाशांनी बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण बिबट्या काही बंगला सोडायला तयार नव्हता. अखेर वन विभागाच्या कर्मचारी दाखल झाले. बिबट्या बंगल्यात शिरलेल्यामुळे जेरबंद करणं हे अवघडचं होतं. मात्र वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी अतिशय शिताफीनं या बिबट्याला पकडलं. या बिबट्याला बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आलं. हा बिबट्या अंदाजे 2 वर्षं वयाचा आहे. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर रहिवाशांचा जीव भांड्यात पडला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close